नोकरी देण्याचे आमीष दाखवून साठ हजारांची फसवणूक

पिंपरी – चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून 60 हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी दिलीप चौधरी (वय 60, रा. वानवडी, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अण्णासाहेब पवार असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पवार याने जानेवारी 2017 ते मार्च 2017 प्रगती इंटरप्रायजेस, शिवम मार्केट, गाळा क्रमांक 13, कोयनानगर, आकुर्डी, निगडी येथे फिर्यादी यांचे मुलाकडून नोकरी मिळवून देतो, असे सांगून साठ हजार रुपये उकळले. परंतु कोणत्याही प्रकारची नोकरी न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)