नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक व्हा

पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांचे आवाहन

पुसेगाव – दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. युवकांनी शिक्षणानंतर केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्यातील कला गुणांचा व कौशल्याचा आपल्या भावी जीवनात उपयोग करून एक आदर्श नागरिक बनावे असे आवाहन माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे नातू व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुसेगाव येथील श्री सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी राज्याचे वित्त विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, रणधिर जाधव, सरपंच अभयसिंह राजेघाटगे उपस्थित होते. तेंव्हा वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन कृषी क्षेत्रातील नवनवीन सेंद्रिय शेतीची माहिती तसेच सेंद्रिय शेती पासून घेतलेल्या शेतमालाची आवर्जून माहिती घेऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले. कृषी प्रदर्शन मधील नव उद्योजकांची माहिती घेऊन त्यांना भविष्य काळात चांगले व्यासपीठ दिले जाईल व लागेल ती मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, युवकांनी शिक्षणाबरोबरच खेळांना व कलेला महत्व देऊन पुस्तकी ज्ञानाशिवाय अवांतर ज्ञान प्राप्त करावे. नोकरी मिळाली नाही तर निराश न होता स्वतःचा व्यवसाय उभारावा व त्यासाठी पालकांनी त्याना सहकार्य करावे. समाजकारण करण्यासाठी राजकारणातही अभ्यासू युवकांनी पुढे आले पाहिजे. चांगले लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी श्री सेवागिरी मंदिरात येऊन श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन ट्रस्ट करीत असलेल्या कार्याची माहिती घेऊन अभिनंदन देखील केले श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट हे इतर देवस्थानसाठी एक आदर्श आहे असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)