पुणे : नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे- चांगली नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणाची दिड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बिबवेवाडी भागात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सागर वाघमारे (वय 23, रा. सुखसागरनगर) यांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने फिर्यादी यांना मोबाइलवर फोन करून चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याबदल्यात त्याने फिर्यादींना वेळोवेळी 1 लाख 55 हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा करायला सांगितले. मात्र अनेक दिवस होवूनही नोकरी मिळालीच नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. पी. देवकाते करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)