नोकरीच्या बहाण्याने तरूणाची सुमारे दीड लाखाची फसवणूक

विविध कारणे सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास पाडले भाग


दोन महिलेंसह चौघांवर सिंहग्ड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे- हिंजवडी येथील एका कंपनीत नोकरी लावण्याच्या अमिषाने तरूणाची सुमारे दीड लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी अभिषेक गुप्ता, निखिल विजय कुलकर्णी आणि दोन महिलांविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑगस्ट ते 5 डिसेंबर 2017 या कालावधीत हिंगणे खुर्द येथील आनंदविहार कॉलनी परिसरात घडली.
याबाब्त पंकज चिमुरकर (वय 27, रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार 19 सप्टेंबर 2017 रोजी फिर्यादींना महिलेचा फोन आला. आयबीएम हिंजवडी येथील एका कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून सिलेक्‍शन झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर 26 ऑक्‍टोबर 2017 रोजी ड्युटी जॉईन करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. जॉबचे रजिस्टेशनसाठी ऑनलाईन अडीच हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कंपनीसोबत प्रोफाईल लिंक करणे, इंटरव्यूह क्रॅक करणे, सिक्‍युरिटी बॉंण्ड करणे, हेल्थ इन्श्‍युरन्स काढण्याच्या नावावर वेळोवेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास लावले. त्यानंतर आयबीएन कंपनीतील ही नोकरी दुसऱ्या व्यक्तीला मिळाली आहे. भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी जीएसटी भरणे आवश्‍यक असल्याचे सांगून फिर्यादींना वेळोवेळी मिळून 1 लाख 44 हजार 705 रुपये ऑनलाईन ट्रॉन्सफर करण्यास लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी.एल.खोडदे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)