नोकरीच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक

पिंपरी (प्रतिनिधी) – पुण्यातील नामांकीत कॉलेजमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन चार जणांच्या टोळीने एकाची एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर 2015 ते मार्च 2018 दरम्यान ऑनलाईन ट्रान्झॅक्‍शनद्वारे घडली.रमेश झलपुरे (वय 49, रा.पिंपळे गुरुव) असे फसवणुक झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश झलपुरे यांना पुण्यातील एका नामांकीत कॉलेज मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, त्यासाठी प्रोसेस फी म्हणुन रमेश यांच्याकडून सप्टेंबर 2015 पासून ते आजपर्यंत वारंवार ऑनलाईन माध्यमाद्वारे एकूण एक लाख पाच हजार रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात चार जनांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ते अद्याप फरार आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)