नोंदणी न केल्याने 30 लाखांचा दंड : “रेरा’ कोर्टाचा दणका

पुणे – “रेरा’ अर्थात रिअल इस्टेट रेग्युलटरी अॅक्‍ट अंतर्गत बांधकाम प्रकल्पाची नोंद न केल्याने 30 लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश “रेरा’ कोर्टाने दिला आहे. संबंधित प्रकल्प सदाशिव पेठ येथील आहे.

मेसर्स गीतांजली अमान कन्स्ट्रक्‍शनच्या उत्कर्ष अपार्टमेंट 1512 व 1514 , सदाशिव पेठ, पुणे या प्रकल्पाची “रेरा’कडे नोंदणी करण्यात यावी, यासाठी संबंधित प्रकल्पातील फ्लॅट खरेदीदार रमेश परांजपे व बालाजी समुद्र यांनी अॅड. मानसी मिलिंद जोशी व अॅड. प्रज्ञा कुलदीप वैद्य यांच्यामार्फत “रेरा’ कोर्टात कलम 3 अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तक्रारदार यांनी या प्रकल्पामध्ये सन 2014 चे सुमारास फ्लॅट बूक करून नोंदणीकृत करारनामा केला होता. सन 2017 मध्ये “रेरा’ कायदा अस्तिवात आल्यानंतर या बांधकाम प्रकल्पाची “रेरा’ कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी पुरेसा वेळ बिल्डरकडे होता. परंतु बिल्डरने जाणूनबुजून उत्कर्ष अपार्टमेंट हा प्रकल्प “रेरा’ कायद्याअंतर्गत नोंदणीकृत केला नाही, असा निष्कर्ष कोर्टाने काढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“रेरा’अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक असूनही मे. गीतांजली अमान कन्स्ट्रक्‍शनने या प्रकल्पाची नोंदणी न केल्यामुळे प्रकल्प किमतीच्या 3 टक्‍के म्हणजेच रुपये 30 लाख दंड कोर्टाने ठोठावला असून हा प्रकल्पाची “रेरा’ कायद्याअंतर्गत नोंदणी 3 आठवड्यांत करण्याचे आदेश कोर्टाने पारित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)