नॉर्थइस्ट युनायटेडच्या खेळीणे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण 

हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा 2018 

मुंबई: इंडियन सुपर लिगच्या चालू पर्वामध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने मोसमाची सुरवात धडाक्‍यात केली असून त्यांच्या चाहत्यांमध्ये जल्लोशाचे वातावरण आहे. कारण अद्याप एकदाही नॉर्थैस्टच्या संघाला बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे या मोसमाची त्यांची सुरुवात बगता ते बाद फेरीत निश्‍चीतच धडक मारतील अशी आशा यावेळी चाहत्यांमध्ये आहे.
आधीच्या चार मोसमांमध्ये नॉर्थइस्टला अपेक्षापूर्ती करता आली नाही. आतापर्यंत सहा सामन्यांत नॉर्थइस्टने त्या तुलनेत खेळ उंचावला आहे. त्याद्वारे त्यांनी अपयशी प्रारंभ तरी नक्कीच टाळला आहे. या घडीला नॉर्थइस्ट गुणतक्त्‌यात पाचव्या क्रमांकावर आहे, पण आघाडीवरील एफसी गोवा संघापेक्षा ते केवळ पाच गुणांनी मागे आहेत.

मात्र, असे असूनही नॉर्थइस्टचे चाहते सध्या चिंतीत का आहेत असा प्रश्न पडतो. याचे कारण त्यांनी अशा स्थितीचा अनुभव या पूर्वी देखिल घेतलेला आहे. त्यातून त्यांना केवळ अपेक्षाभंगालाच सामोरे जावे लागले. यासाठी 2016च्या मोसमाचे उदाहरण देता येईल. त्यावेळी एमिलीयानो अल्फारो याच्या धडाक्‍यामुळे नॉर्थईस्टने पहिल्या पाच सामन्यांतून दहा गुणांची कमाई केली. त्यानंतर मात्र त्यांनी सलग चार सामने गमावले. सहा सामन्यांत एकही विजय मिळविता न आल्यामुळे ते पिछाडीवर पडले. अखेरीस त्यांनी थोडी मुसंडी मारली, पण शेवटच्या सामन्यात केरळा ब्लास्टर्सकडून हरल्यामुळे त्यांना फटका बसला. बाद फेरीतील प्रवेशासाठी त्यांना केवळ दोन गुण कमी पडले. नॉर्थइस्टला मागे टाकून आगेकूच केलेल्या एटीकेने मग थेट विजेतेपदापर्यंत घोडदौड केली.

यावेळी मात्र चित्र समुळ बदलले आहे. एल्को शात्तोरी यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हा संघ झपाटून केला आहे. बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याची संयुक्त मालकी असलेल्या या संघाने या मोसमात सफाईदार प्रारंभ केला आहे. कोणताही अडथळा न येता त्यांची वाटचाल सुरु आहे. शात्तोरी यांनी सांगितले की, माझ्या आधीचे प्रशिक्षक बघता या मोसमात आम्ही अशी वाटचाल करू असे कुणालाही वाटले नसेल. क्‍लब, खेळाडू आणि संघ पदाधिकारी अशा सर्वांना अभिमान वाटेल अशा स्थितीत आम्ही आहोत, पण अजून मोठा पल्ला कापायचा आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करीत राहू.

नॉर्थइस्टच्या वाटचालीचे मुख्य श्रेय बार्थोलोम्यू ओगबेचे याला द्यावे लागेल. तो गोल्डन बुट किताबाच्या शर्यतीत संयुक्त आघाडीवर आहे. त्याचे मैदानावरील अस्तित्व भक्कम असते. तो वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना हुलकावणी देतो. 34 वर्षांचा हा खेळाडू संघाचा आधारस्तंभ ठरला आहे. त्याने संघाचे दहा पैकी सहा गोल केले आहेत. हे प्रमाण 60 टक्के आहे. याचा दुसरा मुद्दा असा की नायजेरीयाच्या या स्ट्रायकरवर संघ प्रमाणाबाहेर अवलंबून असल्याचेही दिसून येते. नेदरलॅंड्‌सच्या शात्तोरी यांच्या संघाला मोसमाच्या पुढील टप्यात ही बाब अडथळा ठरू शकते.

नॉर्थइस्टचा मैदानावरील शिस्तबद्ध खेळ वैशिष्ट्‌यपूर्ण ठरला आहे. त्यांचा बचाव संघटित आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ सात गोल झाले आहेत, जे प्रमाण बेंगळुरू एफसीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहे. शात्तोरी यांनी संघाची क्षमता खऱ्या अर्थाने उंचावली आहे. खेळाचे सुस्पष्ट स्वरुप आणि बदली खेळाडूंची धुर्त निवड यामुळे हे शक्‍य झाले आहे. आयएसएलमधी संघ वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतात असे चित्र नेहमी दिसत नाही. प्रतिस्पर्ध्याचे पक्के दुवे कमकुवत करणे आणि अनुकूल निकाल साध्य करणे नेहमी घडत नाही. 4-2-3-1 आणि 4-4-2 अशा दोन स्वरुपांशी नॉर्थइस्ट तुलनेने सहज जुळवून घेतो. इच्छाशक्ती आणि निर्धारामुळे हा संघ कडवा प्रतिस्पर्धी ठरतो. फॉर्मसाठी झगडत असलेल्या गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवरील 4-3 अशा विजयासह त्यांनी हे दाखवून दिले आहे. नॉर्थइस्टच्या चाहत्यांसाठी संघाच्या पुढील काही सामन्यांतून चित्र स्पष्ट होईल. सुरवातीचे संकेत तरी त्यांना जल्लोषाची संधी अखेरीस मिळेल असेच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)