नॉर्थइस्टने गोव्याला बरोबरीत रोखले

गुवाहाटी- हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड आणि एफसी गोवायांच्यातील वेगवान खेळामुळे रंगतदार ठरलेल्या लढतीत 2-2 अशी बरोबरी झाली. गेल्या मोसमात आक्रमक खेळाचा धडाका लावलेल्यागोव्याविरुद्ध नॉर्थइस्टने घरच्या मैदानावर एक गुण मिळवित आपल्या मोहिमेला समाधानकारक प्रारंभ केला.

येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर गोव्याने मध्यंतरास 2-1 अशी आघाडी घेतली होती. दोन्ही गोल कोरोमीनासने केले होते. फेडेरिकोगॅलेगोमुळे नॉर्थइस्टने आठव्याच मिनिटाला खाते उघडण्यात यश मिळविले होते. यजमान संघाने उत्तरार्धात आठव्या आणि एकूण 53व्यामिनिटाला बरोबरी साधली. बार्थोलोम्यू ओगबेचे याने हा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोलसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकलेनाहीत.

-Ads-

स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यासाठी कोरोची कामगिरी बहुमोल ठरली. गत मोसमात सर्वाधिक 18 गोल केलेल्या कोरोनेयंदा पहिल्याच लढतीत दोन गोलांची भर घातली.

खाते उघडण्याची शर्यत यजमान नॉर्थइस्टने जिंकली. गोव्याचा नवा गोलरक्षक महंमद नवाझने ऑफसाईडसमजून चेंडूवर हातात घेतला, पण ऑफसाईड नसल्यामुळे फ्री-किक नॉर्थइस्टला मिळाली. त्यावरफेडेरिको गॅलेगोने घोडदौड करीत अफलातून फटका मारत चेंडू नेटमध्ये घालविला.

गोव्याने सहा मिनिटांत बरोबरी साधली. 14व्या मिनिटाला कोरोने हा गोल केला. त्याने आधी जॅकीचंद सिंगला पास दिला. उजवीकडूनजॅकीचंदने आगेकूच केली. तोपर्यंत कोरोने वेगाने पेनल्टी क्षेत्र गाठले. जॅकीचंदने मारलेल्या चेंडूवर ह्युगो बौमौसने हेडिंगचा प्रयत्न केला, पण तोचुकला. नॉर्थइस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने चेंडू पंच करायचा प्रयत्न केला, पण हा चेंडू कोरोपाशी पडला आणि मग त्याने अचूक संतुलनसाधत गोल केला. गोव्याने मध्यंतरास सहा मिनिटे बाकी असताना दुसरा गोल केला. कोरोने बौमौसची चालसत्कारणी लावली.

सामन्याची सुरवात वेगवान झाली. दुसऱ्या मिनिटाला जॅकीचंदने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने डावीकडे वळून फटका मारला, पण तो स्वैर होता.

पाचव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याने मिळविला. त्यावर मध्यरक्षक बौमौसने चेंडू प्रमाणाबाहेर ताकद लावून मारला. त्यामुळेही संधी वाया गेली. पुढच्याच मिनिटाला गोव्याला आणखी एक कॉर्नर मिळाला. त्यार कर्णधार मंदार राव देसाई याने बॉक्समध्ये मारलेला चेंडूरेहेनेश याने पुढे सरसावत अडविला. रेहेनेश तोल जाऊन पडला आणि त्याला थोडे लागले.

19व्या मिनिटाला मंदारने डावीकडे चेंडू मिळविला, पण त्याचा फटका नॉर्थइस्टचा किगन परेराने अडविला. त्यानंतर गोव्याने लागोपाठ दोनकॉर्नर मिळविले, पण रेहेनेशने हे आक्रमण थोपविले. या लढतीत जमशेदपूरने कोल्हापूरच्या निखील कदम याला संधीदिली. त्याने उत्तरार्धात दोन प्रयत्न केले. 67व्या मिनिटाला त्याचा फटका नवाझने थोपविला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)