नॉईजी बॉईज, पुणे वॉरीयर्स एफसी संघ उपांत्य फेरीत 

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा 

पुणे – व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेत नॉईजी बॉईज, पुणे वॉरीयर्स एफसी आणि फिनाक्‍यु गॉग एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय व तृतीय श्रेणीच्या उप-उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात सुखाई एफसी संघाने आयोजक व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) ब संघाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सुखाईच्या (राजु राम याने दोन तर, अब्दुल सय्यद याने निर्णायक गोल करून संघाचा विजय सुकर केला. व्होबा ब संघाकडून मारझीन शेख व रियान जहागीरदार यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात प्रतिक साबळे व अजित चव्हाण यांनी केलेल्या गोलाच्या जोरावर नॉईझी बॉईज संघाने सासवड एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रसाद नाईक, विवेक घेइनंद व अनिकेत गुप्ता यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर पुणे वॉरीयर्स एफसी संघाने शिवाजीयन्स्‌ एफसी संघाचा 3-0 असा सहज पराभव करून अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले.

फिनाक्‍यु गॉग एफसी संघाने केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हन संघाचा 3-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. यामध्ये फिनाक्‍युच्या इश्‍वर जी. याने एक तर, प्रकाश थोरात याने दोन गोल केले. अव्वल आणि प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यात सांगवी एफसी संघाने आर्यन्स्‌ एफसी संघाचा टायब्रेकमध्ये 4-3 असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.

सविस्तर निकाल : अव्वल आणि प्रथम श्रेणी: उप-उपांत्यपुर्व फेरी – सांगवी एफसीः 4 (वैभव पी., अक्षय सी. शॉन ए., श्रेयस एस.) टायब्रेकमध्ये वि.वि. आर्यन्स्‌ एफसीः 3 (वासिम सय्यद, श्रीराज नायर, दिपक केएल.); (गोल चुकविलाः विशाल निकम, सिध्देश्‍वर कन्नुर); पूर्णवेळ 0.
व्दितीय व तृतीय श्रेणी: उप-उपांत्यपुर्व फेरी – सुखाई एफसीः 3 (राजु राम 13, 30 मि., अब्दुल सय्यद 37 मि.) वि.वि. व्होबा बः 2 (मारझीन शेख 19 मि., रियान जहागीरदार 24 मि.).
उपांत्यपुर्व फेरी – नॉईझी बॉईजः 2 (प्रतिक साबळे 25 मि., अजित चव्हाण 38 मि.) वि.वि. सासवड एफसीः 1 (हृषीकेश खेडेकर 3 मि.), पुणे वॉरीयर्स एफसीः 3 (प्रसाद नाईक 12 मि., विवेक घेइनंद 19 मि., अनिकेत गुप्ता 36 मि.) वि.वि. शिवाजीयन्स्‌ एफसीः 0, फिनाक्‍यु गॉग एफसीः 3 (इश्‍वर जी. 20 मि., प्रकाश थोरात 40, 45 मि.) वि.वि. केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हनः 0.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)