नैसर्गिक साधन संपत्तीद्वारे उत्पन्न वाढीसाठी रिमोट सेसिंग मॅपिंग महत्वाचे – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : नैसर्गिक साधन संपत्तीचा उत्पन्न वाढीसाठी पुरेपूर वापर व्हावा. या दृष्टिकोनातून रिमोट सेसिंगद्वारे मॅपिंग करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सुंदर संवेदन उपयोजना केंद्र (नागपूर) (एमआरसॅक) या संस्थेद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रिमोट सेसिंगद्वारे मॅपिंग हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागानी या चर्चासत्रामध्ये मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेऊन आपल्या विभागाची अचूक व योग्य माहिती पुरवावी, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सिंधुदुर्गतील जिल्हा नियोजन समितीच्या नविन सभागृहात एमआरसॅक म्हणजे महाराष्ट्र रिमोट सेसिंग ऍप्लीकेशन सेंटरच्या वतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांदा ते बांदा हा शासनाचा 142 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु आहे. या दृष्टीने जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीची अचूक माहिती आवश्‍यक आहे. यासाठी जिल्ह्याचे रिमोट सेसिंग मॅपिंग करण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पर्यटन,कृषी, फलोद्यान, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, क्रीडा विकास, रस्ते विकास, पाणी पुरवठा, दुग्धविकास आदी सर्व विभागाशी संबंधीत अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती कुठे व कशाप्रकारे उपलब्ध आहे याचीही माहिती या मॅपिंग कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे. अधिकारी वर्गाने अतिशय तन्मयतेने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)