नैसर्गिक बायपासही आता शक्‍य

आयुर्वेदात बायपास शस्त्रक्रियेला पर्याय नसल्याचे सांगितले जाते. मात्र, आयुर्वेद क्षेत्रात अनेक वर्षे काम करत असताना प्रदीर्घ आणि यशस्वी संशोधनानंतर नावीन्यपूर्ण अशा नैसर्गिक बायपास उपचारपद्धतीचा (थेरपीचा)शोध लावण्यात आलेला आहे. या उपचारपद्धतीचा वापर करून, हृदयामध्ये असलेले ब्लॉकेज आणि (हृदयाच्या) झडपेसंबंधीचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. नैसर्गिक बायपास उपचारपद्धती (थेरपी) ही एकदम नावीन्यपूर्ण असून, शुद्ध आणि खात्रीशीर आयुर्वेदिक औषधांचा आणि ज्ञानाचा वापर करूनच रुग्णाला संजीवनी दिली जाते. हजारो वर्षांपासून चालत आलेले हे ज्ञान म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे.

नैसर्गिक बायपास आयुर्वेदिक उपचार पूर्णपणे सुरक्षित आहे. फुफ्फुसाचे दीर्घकालीन (जुनाट) आजार, मधुमेह आणि रक्‍तातील गुठळ्या यांसारख्या आजारांमुळे ज्यांचे हृदय कमकुवत झाले आहे, अशा लोकांसाठी ही उपचार पद्धती विशेष करून फायद्याची आहे. अशा प्रकारची गुंतागुंत असलेले रुग्ण कोणतीही मोठी शस्त्रक्रिया सहन करू शकत नाहीत. आजपर्यंत, हजारो रुग्णांनी या नैसर्गिक बायपास उपचाराचा फायदा घेतला असून त्यांचे आयुष्य अधिक दर्जेदार झाले आहे.

-Ads-

भारतात हृदयरोगाचे प्रमाणे वाढतच चालले आहे, मग वय, लिंग किंवा आर्थिक स्थिती काहीही असू दे. एका नवीन संशोधनानुसार, सहा कोटींहून जास्त भारतीय हृदयरोगाने त्रस्त आहेत.अगदी आतापर्यंत, बायपास शस्त्रक्रीया हीच यावरची सर्वाधिक सर्वसामान्य उपचारपद्धती होती. तरीही, 80 टक्‍क्‍यांहून जास्त रुग्णांना ती परवडू शकत नाही. बायपास शस्त्रक्रिया ही अजूनही प्रामुख्याने उच्च मध्यम आणि उच्चभ्रू वर्गलाच परवडण्याजोगी आहे. समाजात असे अनेक घटक आहेत ज्यावर ऍलोपथीची औषधे आणि शस्त्रक्रिया, उपचार करू शकत नाहीत. परवडणाऱ्या दरात लोकांना अधिक चांगल्या शारीरिक आरोग्याचा अनुभव द्यायचा असेल, तर आयुर्वेदाला पर्याय नाही. त्यामुळेच काळाच्या ओघात हरवून गेलेली आयुर्वेदाची कला पुनरुज्जीवित करण्यासाठी ही अभिनव नैसर्गिक बायपास उपचार पद्धती शोधण्यात आली आहे.

डॉ. संतोष ढगे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)