नैराश्‍यापोटी मंचर येथील तरुणाची आत्महत्या

मंचर- नैराश्‍यापोटी मंचर येथील अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 8) रात्री घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश वैजनाथ पोतदार आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली होती.
संतोष बेळअप्पा पांचाळ (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांचाळ हे सोमवारी (दि. 8) सकाळी 9 वाजता कामाला गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा भाऊ दिलीप पांचाळ यांचा फोन आला की, बहिण कामिनी वैजनाथ पोतदार हिच्या घरी काहीतरी गडबड झाली आहे. त्यामुळे पांचाळ हे लगेचच बहिणीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना त्यांचा भाचा गणेश पोतदार याने किचनमधील पत्रा असलेल्या अँगलला दोरीने फाशी घेतलेली दिसली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅंटच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये असे लिहिले होते की, मी जीवनात असफल झालो आहे. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. मला माफ करा. आजी मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पोतदार याचा मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ए. बी. मडके करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)