नेहा ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ शोमध्ये झळकणार

अभिनेत्री नेहा पेंडसे आता हिंदीत छोट्या पडद्यावर झळकणार आहे. नेहा कॉमेडीस्टार कपिल शर्मासोबत ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ या शोची सहसूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची कास्ट आधीच ठरली असून त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीतले एक प्रसिद्ध नाव म्हणून नेहाची निवड करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

नेहाने यापूर्वी ‘मे आय कम इन मॅडम?’ या टीव्ही शोमधून अनेकांच्या मनात घर केले आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्ल्याळम या भाषांमधल्या सिनेमांमध्ये तिने काम करुन आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. आता ती सूत्रसंचालक या नवीन भूमिकेसाठी उत्सुक आणि सज्ज झाली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)