नेहा धुपिया उलगडणार “प्रेग्नन्सी’मागील रहस्य

नेहा धुपियाने बॉयफ्रेंड अंगद बेदीबरोबर 10 मे रोजी गुपचूप लग्न उरकून सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. तिने अशाप्रकारे अचानक आणि गुपचूप लग्न करण्यामागे तिच्या प्रेग्नन्सीचे कारण असल्याचे बोलले जात होते. कारण ती जिथे जिथे जात असे, तिथे ती अगदी सैल कपडे घालूनच जात असे. त्या काळात तिचे वजनही वाढलेले होते. म्हणूनच हा अंदाज वर्तवला जाऊ लागला होता.

अंगद बेदीने या सर्व अफवा असल्याचे वारंवार म्हटले होते. मूल होऊ देण्या आगोदर आम्हाला आमचे घर खरेदी करायचे आहे, असे कारणही त्याने सांगितले होते. मात्र आता स्वतः नेहा स्पष्टपणे या अफवेमागील सत्य कथन करणार आहे. नेहा आता मात्र खरोखर प्रेग्नंट आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळते आहे. याची अधिकृत घोषणा अंगद आणि नेहा दोघेही मिळून करणार असल्याचीही शक्‍यता व्यक्‍त होते आहे. पण जोपर्यंत अशी घोषणा होत नाही, तोपर्यंत त्याबाबत छातीठोकपणे काहीही सांगता येऊ शकणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंगद बेदीचा साईड रोल असलेला “सूरमा’ नुकताच बऱ्यापैकी हिट झाला. “लस्ट स्टोरीज’मध्ये नेहा धुपियापण दिसली होती. याशिवाय अजय देवगणचे होम प्रॉडक्‍शन असलेल्या “हेलिकॉप्टर ईला’मध्ये नेहा धुपियाचा महत्वाचा रोल असणार आहे, असे समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)