नेहा धुपियाकडे गुडन्यूज

नेहा धुपियाने बॉयफ्रेंड अंगद बेदीबरोबर 10 मे रोजी गुपचूप लग्न उरकून सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. तिने अशाप्रकारे अचानक आणि गुपचूप लग्न करण्यामागे तिच्या प्रेग्नन्सीचे कारण असल्याची चर्चा सोशल मिडीयावर जोरदार रंगली होती. प्रेग्नसीचे दावेही नेहा व अंगदने फेटाळून लावले होते. परंतु आता नेहा धुपियाने स्वत: इंस्टाग्राम अकाऊंटवरून गुडन्यूज दिली आहे.

इंस्टाग्रामवरील या फोटोत नेहा बेबी बंपसह अंगदसोबत दिसत आहे. नेहाने या फोटोला कॅप्शन दिली आहे की, नवीन सुरुवात होत आहे. आम्ही तीन… सतनाम व्हायगुरू असे लिहिण्यात आले आहे.

Here’s to new beginnings … #3ofUs …. ?? #satnamwaheguruੴ

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

-Ads-

दरम्यान, अंगद बेदीचा साईड रोल असलेला “सूरमा’ नुकताच बऱ्यापैकी हिट झाला. “लस्ट स्टोरीज’मध्ये नेहा धुपियापण दिसली होती. याशिवाय अजय देवगणचे होम प्रॉडक्‍शन असलेल्या “हेलिकॉप्टर ईला’मध्ये नेहा धुपियाचा महत्वाचा रोल असणार आहे, असे समजते आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)