नेहा तरंगे, पूर्वा चव्हाण यांना मिळाली शिष्यवृत्ती

रेडा- धर्मादाय सह आयुक्त कार्यालय व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्याच्या ग्रामीण भागातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातून रेडणी येथील नेहा सचिन तरंगे व कळंब येथील पूर्वा बंडू चव्हाणची निवड झाली असून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगेसो, दगडूशेठ देवस्थानचे अध्यक्ष अशोक गोडसे, विश्वस्त शिवराज कदम-जहागीरदार, शिव-कल्याण संस्था समुहाचे संस्थापक शहाजीराजे भोसले, सचिन तरंगे, विजयराव लोंढे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)