नेहा कक्‍कडने केले रणबीर कपूरला प्रपोज

गायिका नेहा कक्‍कड आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहलीमध्ये ब्रेकअप झाल्यापासून खूप चर्चेत आहे. ब्रेकअपने दुःखी झालेल्या नेहाने चक्‍क अभिनेता रणबीर कपूरला प्रपोझ केल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसते आहे. नेहा रणबीरला म्हणते की, मी तुला खूप पसंत करते. मी तुला या सगळ्यांसमोर प्रपोझ करत आहे. तुला माझ्यासोबत डान्स करायला आवडेल का? नेहाचे हे प्रपोझल ऐकून रणबीर तिला उचलूनच घेतो. जेव्हा नेहा गाण्याच्या रिअॅलिटी शो लिटिल चॅम्प्समध्ये जज होती, तेंव्हाचा हा व्हिडीओ आहे.

नेहा आणि हिमांशने ‘हमसफर’ या व्हिडीओत एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि ओळखीच रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. त्यानंतर इंडियन आयडलच्या मंचावर हिमांशने नेहाला प्रपोझ केले होते. यानंतर सगळे सुरू असताना अचानक एक दिवस नेहा आणि हिमांशने एकमेकांना अनफॉलो केले होते. ब्रेकअपची माहिती देत या दोघांनी एकमेकांच्या अकाऊंटवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. मात्र मग नेहा आणि रणबीरचा व्हिडीओ असा मध्येच अचानक व्हायरल होण्यामागचे कारण काय असावे. हा व्हिडीओ मुद्दाम तर व्हायरल केला गेला नसावा ना. या व्हिडीओबाबत अलियाला समजले तर नेहा कक्‍कडचे काय होईल कोणास ठाऊक.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर सर्व सकारात्मक गोष्टींचा आनंद ती घेत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी रणबीर कपूरबरोबरच्या छान रोमॅंटिक क्षणांची सोबत रहावी, असा तिचाच प्रयत्न असल्यासारखे वाटते. काहीही असो नेहाने आपली निराशा झटकण्यासाठी मनाची तयारी केली, ही तिच्या फॅन्ससाठीही आनंदाची बाब आहे. रणबीरने प्रपोजल स्वीकारले की नाही, यात कोणालाही इंटरेस्ट असता कामा नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)