नेहाच्या सुवर्णपदकाने भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा

सातारो, दि. 10 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील भुईंज गावची सुकन्या नेहा संदेश देशमुख हिने जिल्हास्तरीय हार्डल्स ऍथलेटिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक मिळविण्याचा मान पटकविला. नेहाच्या या यशाने भुईंज गावच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला गेला आहे.
भुईंज येथील नेहा देशमुख ही वाई येथील किसन वीर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तिने हार्डल्स ऍथलेटिक या स्पर्धेत भाग घेतला होता. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदकाचा मान मिळविला. जिल्हा स्तरावरील स्पर्धेनंतर तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेहा देशमुख हिला प्रा. एस. सी. अहिवळे, प्रा. एस. टी. चव्हाण, प्रा. एम. व्ही. जाधव, प्रा. पेै. गजानन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नेहाच्या यशाचे भुईंजसह परिसरात कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)