नेहरू मेमोरियलच्या तीन सदस्यांची केंद्राकडून हकालपट्टी

नवी दिल्ली: नेहरू मेमोरियल म्युझीयम अँड लायब्ररी सोसायटी (एनएमएमएल) च्या तीन सदस्यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आहे. तीनमूर्ती स्टेटला सर्व पंतप्रधानांचे म्युझीयम बनवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याबद्दल ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अर्थशास्त्री नितीन देसाई, प्रो. उदयन मिश्रा आणि माजी नोकरशाह बीपी सिंह अशी बरखास्त केलेल्या सदस्यांची नावे आहेत. आणखी एक सदस्य प्रताप भानू मेहता यांनी अगोदरच राजीनामा दिलेला आहे.

2016 मध्ये शक्ती सिन्हा यांना एनएमएमएकचे अध्यक्ष नियुक्त केल्याच्या निषेधार्थ त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या चौघांच्या जागी पत्रकार अर्णव गोस्वामी, भाजपा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि आयजीएनसीएचे अध्यक्ष राम बहादूर राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मंत्री एमजे अकबर हे एनएमएमएलच्या कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष असतील. 29 ऑक्‍टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आलेल्या असून नवीन सदस्यांचा कार्यकाल 25 एप्रिल 2020 पर्यंत असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)