नेहरूनगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

पिंपरी – नेहरूनगर परिसरात वायसीएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग पडले आहेत. त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला असून वाहनांना ही जनावरे आडवी येत असल्याने अपघाताचा धोका आहे. पाऊस सुरु होत असल्याने या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

पाऊस कधीही सुरु होण्याची शक्‍यता असून रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट अद्यापपर्यत लावण्यात आली नाही. कचऱ्यातून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असून परिसरातही सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. त्याची विल्हेवाट वेळेच्या आत लावली नाहीतर रोगराईला आमंत्रण दिल्यासारखे होईल. कचऱ्यामुळे डेंगू अथवा मलेरिया सारख्या आजाराची साथ पसरल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांना रस्त्यातून वाट काढणे कठीण झाले आहे.

-Ads-

जवळच असलेल्या एच. ए. मैदानाला उकीरड्‌याचे स्वरुप आले आहे. याठिकाणी सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात. त्याच बरोबर तरूण आणि लहान मुले यांचीही खेळण्यासाठी गर्दी असते. मात्र, याठिकाणीही मोकाट जनावरांची ठिय्या मांडला आहे. जनावरांकडून एच. ए. मैदानात अस्ताव्यस्त कचरा पसरवला जातो. या जनावरांमध्ये अनेकदा वाद होतात. मागे पुढे न पाहता ही जनावरे मिळेल त्या दिशेला धावत सुटतात. या जनावरांचा धक्का लागून नागरीक जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. या जनावरांची संपूर्ण फौजच मैदानात असल्यामुळे त्यांना तिथून हाकलून लावणे शक्‍य नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने या परिसरातील कचरा उचलावा तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)