नेहरूनगरमधून साईबाबा पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

पिंपरी  – नेहरूनगर येथील श्री साई समाधी मंदिर व श्री साई द्वारकामाई सेवा समिती मंदिर या दोन्हीं साईबाबा मंदिराच्या पालख्यांचे मोठ्या उत्साहात नेहरुनगर येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान ठेवले. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी झाले होते.

क्रांती चौकाजवळ असलेल्या साई समाधी मंदिराची पालखी सकाळी आठ वाजता मंदिरात आरती केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात जागोजागी फटाक्‍यांची आतषबाजी करत रांगोळीच्या पायघड्या घालत फुलांची सजावट केलेल्या रथामधुन साईंच्या पादुकांची पालखी शिर्डीकड़े प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, महिला मुले सहभागी झाले होते. गेली 23 वर्षापासून या पालखी मधिल साईबाबांच्या पालखीचा रथ साईभक्त स्वतः नेहरूनगर ते श्री क्षेत्र शिर्डी मंदिर पर्यन्त दरवर्षी ओढत घेऊन ज़ात असतात. नागरिकांनी या पालखी दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री साई समाधी मंदिराची पालखी क्रांती चौकातुन विठ्ठलनगर चौकामार्गे नेहरूनगर – भोसरी रस्त्यावरुन हॉकी स्टेडियम चौकातील श्री साई द्वारकामाई सेवा समिती मंदिरात पोहचली. दोन्हीं पालख्या एकत्र आल्यानंतर या वेळी श्री साईंच्या मूर्तीची आरती करण्यात आली. यावेळी माजी महापौर डॉ वैशाली घोडेकर, नगरसेवक राहुल भोसले उपस्थित होते. हॉकी स्टेडियम चौकातुन श्री साई समाधी मंदिर व श्री साई द्वारकामाई समिती मंदिराची पालखी सोहळा गवळीनगर चौकातून भोसरी औद्यागिक परिसारातून मोशी मार्गे पुणे नाशिक रस्त्यावरुन श्री क्षेत्र शिर्डीकड़े मार्गस्थ झाल्या. या दोन्ही पालख्यांचा 6 ठिकाणी मुक्काम होणार असून दोन्हीं पालख्या 15 नोव्हेंबरला श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)