नेहरुनगरमध्ये कचराकुंड्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी। शहरातील नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेची कचराकूंडी भरून वाहत आहे. परिसरातील नागरिकांबरोबर रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून पालिकेच्या विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून पालिकेच्या संबंधित विभागाने कचराकुंडीतील कचऱ्याची विल्हेवाट लावली नसल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पिंपरी चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्याकडेलाच कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही त्यामध्ये कचरा टाकून मार्गस्थ होतो आहे. यामुळे कचराकुंडी दोन दिवसांतच वाहायला लागते. मात्र, पालिकेचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलायला येत नसल्याने कचरा तसाच साचून राहत आहे. यामुळे परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना या रस्त्यातून चालणे कठीण झाले आहे. तसेच परिसरात कचराकुंडीमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. आधीच शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असताना त्यात डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती जयवंत कदम यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)