नेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर 

जयपूर: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या संस्थात्मक ध्येयधोरणांमुळेच आज देशात एक चहावाला पंतप्रधान होवू शकला, असे टीकास्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सोडले. या वक्‍तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पंडित नेहरु जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. थरुर म्हणाले, आज देशाचे पंतप्रधान पद हे एक चहावाला भूषावित आहे. ते केवळ नेहरुंजीमुळे शक्‍य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे प्रत्येक भारतीय व्यक्‍तीला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. त्यामुळे नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर काही जणांकडून चिखलफेक केली जात आहे. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे ते म्हणाले.

-Ads-

भारत सध्या मंगलयानाच्या माध्यमातून मंगळावर पोहोचण्याचे स्वप्न इस्रोच्या माध्यमातून पाहत आहे. मात्र, या अवकाश संशोधन संस्थेची अर्थात इस्रोची स्थापना नेहरू यांनीच केली. गरीब भारतीयांना अवकाशातील मोठी स्वप्ने दाखवायचे त्यांनी ठरवले. नेहरुंनी आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांची निर्मिती केली. या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये 40 टक्के भारतीय तरुण काम करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
24 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)