नेवासे तालुक्‍यातील पाणी योजना चालणार सौरऊर्जेवर

योजनेचा 64 गावांना मिळणार लाभ, विजेची होणार बचत

गणेश घाडगे

नेवासे  – ज्या गावांची लोकसंख्या कमी असते त्या गावांमध्ये राजकारण्याबरोबर प्रशासनही फारसे लक्ष देत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र याला आमदार बाळासाहेब मुरकुटे अपवाद असून त्यांनी तालुक्‍यात भरीव निधी आणून राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचाच एक भाग म्हणून आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्‍यातील वीज बिलाअभावी बंद पडलेल्या योजना सौरउर्जा चलीत करण्यासाठी नेवासा व्हिजनचे मुकुंद अभंग यांच्या संकल्पनेतून विशेष प्रयत्न करत तालुक्‍यातील आठ पाणी योजना सौर उर्जायुक्त करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणी योजनेच्या गावात पाण्याच्या स्त्रोतापासून सौरउर्जेवर पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नेवासे तालुक्‍यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या अंदाजे 64 गावाच्या या आठ नळ योजना असून हा धाडसी निर्णय घेऊन नेवासे तालुक्‍यातील अनेक गावांच्या पाणी योजनेच्या वीज बिलाचा प्रश्‍न सुटणार आहे. वीज बिलाअभावी अनेक नळ योजना बंद अवस्थेत असून या सौरउर्जा प्रकल्पामुळे गावातील महिलांसह तरुण व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती कमी होणार आहे. तर अनेक नळ योजना बंद अवस्थेमुळे खराब होऊ लागल्या होत्या.

नेवासे तालुक्‍यातील नेवासे खुर्दसह दोन गावे, प्रवरासंगमसह दोन गावे, हिंगोणी-कांगोणी घोगरगावसह दहा गावे, भेंडा-कुकाण्यासह चार गावे, चांदासह पाच गावे, गळनिंब-शिरसगावसह 18 गावे, सोनई-करजगावसह 18 गावे या योजनेत समाविष्ट आहेत. या आठ पाणी योजनेत तालुक्‍यातील मुख्य गावे असल्याने व नागरिकांची पाणी पट्टी भरण्याची मानसिकता नसल्याने या पाणी योजनेला घर-घर लागून लाखो रुपये वीज बिल थकून बंद पडल्याने आ. मुरकुटे यांनी या पाणी योजना कायम स्वरूपी सौर उर्जायुक्त करून नागरिकांचा कायमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न व वीज बिलाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठरवले असल्याचे दैनिक प्रभातशी बोलताना आ. मुरकुटे यांनी सांगितले.

उर्जामंत्री व पाणी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन तालुक्‍यातील या आठ पाणी योजना सौर उर्जावर करण्यासाठी प्रस्ताव दाखल करून लवकरच या योजना सौर उर्जायुक्त होणार आहेत. यावर्षी नेवासा तालुका दुष्काळग्रस्त असल्याने या नळ योजनेच्या वीज बिल व दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे.
आ. बाळासाहेब मुरकुटे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)