नेवासा पोलीस वसाहतीचे भाग्य कधी उजळणार? ; भंगार साहित्याचा पडला खच

दुरवस्थेने कर्मचाऱ्यांवर आली स्थलांतर करण्याची वेळ 

पवन गरुड /नेवासाफाटा: नेवासे पोलीस कर्मचाऱ्याच्या तीन वसाहतीपैकी दोन वसाहती नामशेष झाल्या आहेत, तर एकमेव असलेल्या वसाहतीची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे संरक्षणाला जबाबदार असलेले पोलीस कर्मचारी स्वत:च्या कुटूंबाच्या रक्षणासाठी खाजगी जागा शोधण्याच्या विवंचनेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेवासा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 94 गावे व वाडया वस्त्या येतात, त्यासाठी पोलीस निरीक्षकासह 3 अधिकारी आहेत, प्रशिक्षणार्थी अधिकारीही असतात, 70 कर्मचारी असताना केवळ 24 पोलीस कुटूंबाची राहण्याची व्यवस्था आहे. मात्र इतर पोलीस कुटूंब अजूनही वसाहतीपासून वंचित आहेत. हे सर्व खाजगी ठिकाणी जागा शोधण्याची कायम धडपड करत असतात, त्यामुळे काही कर्मचारी आपल्या मुळ गावापासुन रोज ठाण्यात ये जा करतात.

पोलीस ठाण्यालगतच्या वसाहतीत पुर्वी पोलीस उपनिरीक्षक राहत असत. आता मात्र या पडलेल्या वसाहतीच्या कंपाउंडमध्ये जप्त केलेल्या व अपघातातील भंगार गाड्याचा खच पडलेला आहे. या वसाहतीच्या जागेला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. संत ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यावर असलेला ब्रिटिशकालीन फौजदार बंगला व वसाहत गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस येऊन बंद अवस्थेत आहे. या वसाहात व बंगल्याचे दरवाजे खिडक्‍या,फरशी गायब झाली आहेत.

शहरातील पाण्याच्या टाकी जवळील एकमेव 24 खोल्यांची वसाहत आहे. या वसाहतीचीही अत्यंत दुरावस्था झाली असुन त्या वसाहतीला वाल कंपाउंड नसल्याने मोकाट प्राण्यांचा त्रास सहन करवा लागत आहे, वसाहतीचे बांधकाम जुनाट झालेले असतानाही नाविलाजास्तव 24 कुटूंब या ठिकाणी राहतात. या खोल्यामधील भिंतींना तडे गेले आहेत. तसेच येथील शौचालयाचीही दुरावस्था झाली आहे. वसाहतीच्या दोन्ही लाइन मध्ये गटारी असल्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे.

या वसहतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दुरुस्ती व नवीन वसाहतीचे अनेक प्रस्ताव नेवासे पोलिस ठाण्यामार्फत सबंधित विभागाला पाठवूनही बांधकाम विभाग या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत आहे.


नेवासा पोलीस वसहतीचे व नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचा प्रस्ताव आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी शासन दरबारी मंजूरीसाठी पाठवला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
ज्ञानेश्‍वर पेचे भाजप, नेवासा तालुका अध्यक्ष.


पोलीस वसाहतीची मोठी दुरावस्था आहे. लवकरात लवकर नवीन वसहतीचे काम मार्गी लावावे
रणजीत डेरे ,पोलीस निरीक्षक.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)