नेवासा तहसीलसमोर 14 सप्टेंबरला उपोषण

निघोजमधील घरेपाडल्याचा निषेध ः तहसीलदारांना निवेदन
आवास योजनेच्या नियमाप्रमाणेपुनर्वसन करा
योजनेचेआदेश डावलणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नेवासा फाटा – पारनेर तालुक्‍यातील निघोज आणि पठारवाडी येथेअतिक्रमणात घरेपडल्याच्या प्रकाराचा तालुक्‍यातील झोपडपट्टी धारकांनी निषेध केला. या निषेधार्थ 14 सप्टेंबरला तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचेनिवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

निघोज आणि पठारवाडी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्यास पात्र असतानाही ही अतिक्रमणे पाडण्यात आली, असेनेवाशातील काही झोपडपट्टी धारकांचेम्हणणे आहे. याबाबत नेवाशात संताप व्यक्‍त होत आहे. घरेपाडलेल्यांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश असतानाही अतिक्रमणे नियमित केली नाही. प्रधान मंत्री आवास योजनेत सर्व प्रकारच्या शासकीय जमिनीवर राहात असलेल्या कुटुंबांना आहे त्या ठिकाणी घरे देण्याचे आदेश आहेत, असेनिवेदनात म्हटलेआहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे आदेश उच्च न्यायालयापासून ज्यांनी लपवून ठेवलेअशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी . सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशातून यापूर्वी राहात असलेल्या कुटुंबाना वगळले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राजकीय शक्‍तींनी केलेल्या अतिक्रमणाबाबत होता, मग गरिबांची घरे का पाडली? उच्च न्यायालयापासून ही बाब का लपवून ठेवली. निघोजची घरे पाडली आमचीही पाडतील, अशी भीती झोपडपट्टी धारकांनी व्यक्‍त केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमाप्रमाणे निघोजमधील कुटुंबांचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

श्रावणबाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, अप्पा गायकवाड, आदेश साठे, नंदू वाकडे, मल्हार शिंदे, बाबासाहेब शेलार, देविदास साळुंके, संतोष साळवे, रमेश तवले, गणेश कोरेकर, रमेश तवले, अमोल चव्हाण , भाऊसाहेब भोंदे, बाळासाहेब आढाव, गणपत मोरे, उत्तम साठे यांच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)