नेवाशाला ग्रामविकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ : मुंडे 

भेंडा- नेवासा तालुका हा संतांच्या पावन भूमीचा आहे. तालुक्‍यात ग्रामविकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

औरंगाबादहून आष्टी येथे विशेष दौऱ्यानिमित्त जात असताना नेवासा फाटा येथील “सप्तपदी लॉन्स’ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी त्या बोलत होत्या. तसेच, पुढील महिन्यात नेवासा तालुक्‍यातील नेवासा, उस्थळ, खरवंडी, शिंगणापूर या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या उद्‌घाटनासाठी नेवासा दौऱ्यावर येण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी संत भगवान बाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मुरकुटे होते, तर व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा नेते रामदास गोल्हार, भाजप नेते रामकिसन गर्जे, राजेंद्र किर्तने, युवा नेते मयूर गोल्हार, शिवाजी शिरसाठ, शशिकांत मतकर, बाबासाहेब गोल्हार, डॉ. शिंदे, डॉ. सांगळे, डॉ. दहिफळे, पोलीस कॉ. आव्हाड, अमित फुलसौंदर, ऋषिकेश सोनवणे, अक्षय गोल्हार, शरद गोल्हार, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)