भोर- वीस खोऱ्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या नेरे प्राथमिक शाळेला आमदार संग्राम थोपटे यांनी भेट देऊन या शाळेच्या भौतिक सोयीसुविधांसाठी मागाल ती मदत पुरवली जाईल, असे अश्वासन दिले. या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात चांगले काम असून, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष म्हस्के यांचे शिक्षकांना उत्तेजन देणारे काम स्तुत्य असल्याने या शाळेला संरक्षक भिंतीसाठी तीन लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिली असल्याचे जाहीर करून कामाचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उत्रौली-कारी गटाचे अनिल सावले, भोर तालुका कॉंग्रेसचे आध्यक्ष शैलेश सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष ज्ञानोबा दानवले, संचालक शिवाजी पाटणे, माजी सरपंच आनंदा बढे, उपसरपंच अंकुश सावले, प्रकाश मैंद, चंद्रकांत सावले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष म्हस्के, उपाध्यक्षा शिल्पा आवारी, सरपंच उत्तम गायकवाड, प्रकाश कदम रमेश सावले आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, पालक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज पुरंदरे यांनी केले. यावेळी आमदार थोपटे यांचा संतोष म्हस्के यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन शत्रुघ्न सावले यांनी केले, तर आभार सरपंच उत्तम गायकवाड यांनी मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा