नेमारचे फ्री किक चिकन, अन्‌ मेस्सीचा मॅजिक पिझ्झा 

फिफा विश्‍वचषक स्पर्धेला हजेरी लावणे प्रत्येक फुटबॉलशौकिनाला शक्‍यच नाही. परंतु प्रत्यक्ष रशियाला न जाता या स्पर्धेचा आनंद लुटता येण्यासाठी विविध व्यावसायिकांनी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढविल्या आहेत. भारतातील अनेक रेस्टॉरंटमध्ये फुटबॉलपटूंची किंवा फुटबॉलशी संबंधित नावे असणाऱ्या वैविध्यपूर्ण पदार्थांचे सादरीकरण नव्याने करण्यात येत आहे. नेमारचे फ्री किक चिकन किंवा मेस्सीचा मॅजिक पिझ्झा ही त्यातील काही नावे क्रीडाशौकिनांबरोबरच अस्सल खवय्यांनाही आकर्षित करतील.

कोलकातातील पिझ्झा आऊटलेट्‌सनी तर पेपी पोर्तुगाल, जर्म’ मॅजिक,बेल्जियम रश, फ्रेंच कनेक्‍शन, अर्जेंटिनियन ऊझ किंवा ब्राझिलियन ट्रीट असे नवे ब्रॅंड बाजारात आणले आहेत. अर्थात भव्य स्क्रीन्स, खाद्यपेयांची रेलचेल आणि अन्य भपकेबाज सजावट या सुविधाही फिफा विश्‍वचषकाचा आनंद गेणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेतच. मुंबई, बंगलोर येथील दुकानांनी फुटबॉल फरसाण, ब्राझिलियन बीअर आणि मेस्सीज कॉर्न प्रिपरेशन्स असे पदार्थही बाजारात आणले आहेत. एकंदरीत फिफा विश्‍वचषकाच्या निमित्ताने खाद्यपदार्थांची बाजारपेठही सजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)