नेमबाजी वगळल्यामुळे विपरीत परिणाम- जितू राय 

भारतीय नेमबाजांनी राष्ट्रकुल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी बजावली. परंतु 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा क्रीडाप्रकारच वगळण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला असल्यामुळे भारताला हादरा बसला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतून कोणता खेळ वगळायचा, हा संयोजकांचा अधिकार असला, तरी त्यामुळे भारतातील असंख्य युवा नेमबाजांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे राष्ट्रकुल सुवर्णविजेता नेमबाज जितू रायने सांगितले.

-Ads-

नेमबाजीच्या समावेशासाठी भारत सरकार आणि राष्ट्रीय रायफल संघटना प्रयत्नशील आहे. परंतु त्यात अपयश आल्यास भारताने राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार घालावा, अशी मागणी राष्ट्रीय रायफल संघटनेने केली असल्याचे दाखवून दिल्यानंतर जितू रायनेही संघटनेला पाठिंबा दिला. या बाबत बहिष्काराचा निर्णय जाल्यास भारत सरकार आणि राष्ट्रीय रायफल संघटना यांना आमचा पाठिंबा राहील, असेही त्याने नमूद केले.

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)