नेमटेस्टस क्वीझ अॅपकडून १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक

नवी दिल्ली :   फेसबुककडून अशी क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा नुकताच लिक झाला आहे. नेमटेस्टस (NameTests) या क्वीझ अॅपकडून नुकताच १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असल्याचे समोर आले आहे.

या वेबसाईटवरुन फेसबुकच्या युआरएलवरुन युजर्सची माहिती काढली जात असल्याचे काही सायबर सुरक्षेतील तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. विशेष म्हणजे युजरनी हे अॅप्लिकेशन डिलीट केले तरीही त्यांचा डेटा हॅकर्सकडे राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कोणालाच समजू द्यायेच नसेल तरीही आता ते शक्य नाही. कारण अशाप्रकारच्या हॅकींगमुळे तुमची माहिती तुम्ही काहीच न करता हॅकर्सपर्यंत सहज पोहोचते. यामध्ये तुमचे फोटो, व्हिडियो, वैयक्तिक माहिती अशा सर्वांचा समावेश असतो. नेमटेस्ट्स डॉट कॉम ही अतिशय प्रसिद्ध अशी वेबसाईट असून त्याद्वारे फेसबुकवर वेगवेगळ्या क्वीझ सातत्याने टाकल्या जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत नुकतीच चौकशी करण्यात आली असून, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही ज्याद्वारे युजर्सची माहिती हॅक केली जात असल्याचे समजेल. तसेच या माहितीचा गैरवापर केला जात असल्याचीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात सोशल मीडियाचा वापर करताना आणि विशेषकरुन अशाप्रकारची अॅप्लिकेशन्स वापरताना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)