… नेमकं ‘तेव्हाच’ मोदी गप्प बसतात – शरद पवार

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे नेमकं बोलायला पाहिजे तेव्हाच गप्प बसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी केली आहे.  ते आज  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग फार बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची. परंतु, आता देखील नेमकं बोलायला पाहिजे तेव्हाच पंतप्रधान मोदी गप्प बसतात.

दरम्यान  यावेळी त्यांनी कथुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणावरूनही भाजपवर टीका केली. भाजपाच्या नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. आरोपींना वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यांमध्ये भाजपाचे मंत्री सामील होतात.  देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतके नादान राज्यकर्ते मी पाहिले नव्हते असंही पवारांनी यावेळी म्हंटलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)