नेप्तीत विरोबा यात्रा उत्साहात

नगर – तालुक्‍यातील नेप्ती येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांची दोन दिवसीय यात्रा उत्साहात पार पाडली.
यात्रा उत्सवानिमित्त ग्र्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी उत्सवानिमित्त स्वच्छता अभियान राबवुन मंदिर परिसर स्वच्छ केला. श्री बिरोबा महाराजांच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील युवकांनी प्रवरा संगम येथुन आलेल्या गंगाजलाच्या कावडीची मिरवणुक ढोल ताशे व बॅंडच्या गजरात गावातुन काढण्यात आली. श्री बिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालुन विधीवत पुजा करण्यात आली. सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवासाठी गावातील कामानिमित्त बाहेर गेलेल्या ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री छबीना मिरवणुक ढोल ताशे गजरात व फटाक्‍याच्या आतषबाजीने काढण्यात आली. त्यानंतर रात्री हरीभाऊ बडे नगरकर याचा लोकनाटय तमाशा ,तर दुसऱ्या दिवशी सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुपारी कुस्त्यांचा हगामा भरला त्यात उत्तम कुस्ती करणाऱ्या मल्लावर ग्रामस्थांनी रोख बक्षिसाचा वर्षाव केला. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)