नेपोलियनचा ‘सोन्याचा’ ब्रश!

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट आपल्या कर्तृत्वाने मोठा झाला होता. त्यामुळे तो “सोन्याचा चमचा’ तोंडात धरून जन्मला असे म्हणता येणार नाही. मात्र, पुढील आयुष्यात तो सोन्याचा ब्रश दात घासण्यासाठी वापरत होता! हा ब्रश मूळचा चांदीचा असून त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. त्यावर मुकुटाच्या प्रतिमेखाली “एन’ असे नेपोलियनच्या नावातील आद्याक्षरही कोरलेले आहे. एका खासगी संग्राहकाकडे सध्या हा नेपोलियनचा ब्रश आहे.

टूथपेस्ट आणि टूथब्रश यांची निर्मिती सर्वप्रथमच चीनमध्ये झाली असे म्हटले जाते. कागद, रेशीमसारख्या काही वस्तूंप्रमाणेच या वस्तूही चीनमध्येच प्रथम निर्माण झाल्याचे मानले जाते. पाश्‍चात्त्य देशांमध्ये सतराव्या-अठराव्या शतकांमध्ये फ्रेंच दंतवैद्यांनी या दोन्ही वस्तूंचा प्रसार केला. 1769-1821 या काळातील नेपोलियनही दात स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करीत असे. अर्थात त्याचा हा ब्रश त्याच्या शाही थाटाला शोभणाराच आहे. आता तो हेन्री वेलकमच्या संग्रहालयात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)