नेपाळसाठी बंदरं खुली करुन चीनने भारताविरुद्ध खेळला नवा डाव

काठमांडू – भारताच्या शेजारी राष्ट्रांना मदत करुन भारताची कोंडी करण्यासाठी चीनने नवी खेळी खेळली आहे. व्यापारासाठी भारताच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळला चीनने त्यांच्या देशातील बंदरांचा वापर करु देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नेपाळला व्यापारासाठी भारताची आवश्‍यकता भासणार नाही.

भारतीय उपखंडातील भारताचा सर्वांत जवळचा आणि विश्वासू देश असलेल्या नेपाळला चीनने चार बंदरापर्यंत पोहोचण्यास परवानगी देऊन भारताला जबर धक्का दिला. नेपाळ सरकारने या निर्णयाची माहिती दिली. चीनशी व्यापारी कनेक्‍शन वाढवून भारताची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी नेपाळचा हा उद्देश असल्याचेच द्योतक आहे असे समजले जात आहे.
नेपाळची अर्थव्यवस्था पूर्णपणे भारतासोबतच्या व्यापारावर विसंबून आहे.

जीवनावश्‍यक वस्तुंचा सर्व पुरवठा नेपाळला भारतातून होते. त्यामुळे हे अवलंबित्व कमी करून चीनशी संधान साधण्याचा नेपाळ सरकारचा मानस आहे. त्यामुळे चीनने सुद्धा नेपाळला चार बंदरांवर प्रवेश देत भारतावर कुरघोडी केली आहे. दोन वर्षापूर्वी भारत आणि नेपाळमध्ये सीमावाद झाल्यानंतर नेपाळला तेलाचा आणि औषधाच्या तुटवड्याचा अभूतपूर्व सामना करावा लागला होता.

नेपाळ आणि चीन सरकारमध्ये गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत व्यापारविषयक धोरणावर चर्चा झाली. यात नेपाळला चीनमधील चार बंदरं खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे किंवा रस्तेमार्गाने व्यापाऱ्यांना त्यांचा माल बंदरापर्यंत नेता येईल किंवा बंदरावरुन आणता येणार आहे. मात्र, चीनच्या बंदरांवरुन व्यापार करणे हे व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. नेपाळपासून चीनमधील सर्वात जवळचे बंदर हे दोन हजार 600 किलोमीटरवर आहे. नेपाळमधील रस्त्यांची दुरावस्था ही देखील प्रमुख समस्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नेपाळच्या व्यापार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नेपाळ आणि चीन दरम्यान ट्रांझिट आणि ट्रान्सपोर्ट कराराच्या (टीटीए) प्रोटोकॉलला मान्यता देण्यात आली. काठमांडूमध्ये ही बैठक पार पडली. या झालेल्या करारानुसार टीनजीन, शेनझेन, लायनयुगॅंग आण झानजंग बंदरावर पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रोटोकॉल करारावर सह्या झाल्यानंतर तो अंमलात येईल. भारताच्या दोन बंदरांसह चीनच्या चार बंदरावर प्रवेश मिळत असल्याने हा मैलाचा दगड असल्याचे रवी शंकर या व्यापार मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

चीनमधील बंदरांवरून नेपाळला प्रवेश मिळाल्याने जपान, दक्षिण कोरिया यांच्यासह उत्तर आशियातील देशांचा माल चीनने दिलेल्या परवानगी दिल्याने आता त्या मार्गावरून येण्यास मदत होईल. यामुळे नेपाळचा शिपिंग वेळ आणि खर्चामध्येही बचत होणार आहे. नेपाळला भारतातून कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदारातून प्रवेश मिळतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)