नेपाळमध्ये 200 भारतीय यात्रेकरू अडकले 

काठमांडू: तिबेटमधील कैलास-मानसरोवर यात्रा करून परतणारे सुमारे 200 भारतीय यात्रेकरू खराब हवामानामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी भारतीय दूतावासाकडून प्रयत्न केले जात आहेत. तिबेटच्या सीमेलगत असणाऱ्या नेपाळमधील सिमीकोटमध्ये 150 तर हिल्सामध्ये 50 भारतीय यात्रेकरू अडकले आहेत. खराब हवामानामुळे त्यांना तातडीने हवाई मार्गाने हलवणे शक्‍य नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंशी आणि त्यांच्या कुटूंबीयांशी भारतीय दूतावास सातत्याने संपर्क साधून आहे. परिस्थिती नियंत्रणात असून हवामानात सुधारणा झाल्याबरोबर अडकलेल्या यात्रेकरूंना सुखरूपरित्या सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल, असेही सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. मागील महिन्यात त्याच भागात सुमारे दीड हजार भारतीय यात्रेकरू अडकले होते. त्यांची हेलिकॉप्टर्सच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)