नेपाळमध्ये ‘पॉर्न साईट्सवर’ बंदी, २४००० साईट्स करणार बंद 

काठमांडू: नेपाळ सरकारकडून तब्ब्ल २४००० पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घालण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नेपाळमध्ये जुलै महिन्यामध्ये एका १३ वर्षीय बालिकेवर निर्घृण बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेननंतर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला होता. आता नेपाळ सरकारने अशा घटना रोखण्यासाठी पॉर्न साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून याबाबत सरकारवर विविध माध्यमांमधून टीका होत आहे.
नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला असला तरी याचा काहीही उपयोग होणार नाही असं मत काही जणांनी व्यक्त केले आहे. “इंटरनेटवर असणाऱ्या गोष्टींनी बंदी घालणे ही एक अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया असून जरी आपण बंदी घातली तरी अन्य मार्गांचा वापर करून अशा साईट्स चालूच राहू शकतात.” असे मत इंटरनेट संबंधीच्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष बिनया बोहरा यांनी नोंदवले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)