नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामध्ये 30 मृत्यूमुखी

काठमांडू, – नेपाळमध्ये सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल आहे.

नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण नेपाळमधील सुन्सारी जिल्ह्यामध्ये 7, सिंधुली आणि झापा जिल्ह्यात प्रत्येकी 4 तर बांके, मोरांग आणि पंचथर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तिघाजणांचा मृत्यू झाला. उर्वरित काही जण अन्य वेगवेगळ्या जिल्ह्यात मरण पावले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोरांग जिल्ह्यातल्या सुंदर हराईंचा जिल्ह्यात तीन ज्येष्ठ नागरिक पूरामध्ये बेपत्ता झाले आहेत, असेही गृहमंत्रालयाचे प्रवक्‍ते दीप काफ्ले यांनी सांगितल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. झापा, मोरांग, सापत्तारी, सिराहा, सारलाही, राउताहत, बांके, बारदिया आणि दांग हे जिल्हे पूरामुळे सर्वात जास्त प्रभावित आहेत. मोरांग बिरातनगर येथील विमानतळामध्ये पाणी साचल्यामुळे तेथील हवाई वाहतुक बंद करण्यात आली आहे. नेपाळी लष्कर, पोलिस, आर्म्ड पोलिस दलाचे जवान विमानतळाच्या परिसरातून पाणी उपसण्याच्या कामात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)