नेपाळमधील बिराटनगर महानगर ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट 

संग्रहित छायाचित्र
काठमांडू: नेपाळमधील बिराटनगर शहरातील महापौरांच्या कार्यालयासमोरच आज एक बॉम्बस्फोट झाला. मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. महापौर भीम पराजुल यांच्या कार्यालयातील महानगर प्राधिकरणाच्या कार्यालयात घडला. हा स्फोट झाला, तेंव्हा दुपारची जेवणाची सुटी झाली होती. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी आणि अन्य नागरिक इमारतीमध्ये नव्हते.
त्यामुळे या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कार्यालयातील खिडक्‍यांची तावदाने फुटली.
उपमहापौर इंदिरा कारकी आणि काही वॉर्डांचे अध्यक्ष हे याप्रसंगी इमारतीमध्ये उपस्थित होते. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी इमारतीची पूर्ण नाकाबंदी केली असून सीसीटिव्हीचे चित्रीकरण तपासले जात आहे. या स्फोटामध्ये सहभागी असलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)