नेपाळमधील पूरामध्ये 200 भारतीय अडकले

काठमांडू,- नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये किमान 600 पर्यटक अडकून पडले आहेत. त्यामध्ये किमान 200 जण भारतीय आहेत. तर अन्य 200 जण नेपाळमधील तर उर्वरित 200 जण अन्य देशांमधील आहेत.

नेपाळमधील चितवान मधील सौराहा या प्रसिद्ध पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या या पर्यटकांना पूरामुळे तेथेच अडकून पडावे लागले. रापती आणि बुधिराप्ती या नद्यांना आलेल्या पूरांच्या पाण्याने पर्यटनस्थळांवरील अनेक हॉटेलच्या इमारतींना वेढले आहे. त्यामुळे या हॉटेलमधील पर्यटक अडकून पडले आहेत. या पूरामध्ये आतापर्यंत 49 जण मरण पावले आहेत.

नेपाळमधील गृह मंत्रालयाच्या वृत्तानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध अपघातांमध्ये आतापर्यंत 13 जण जखमी झाले आहेत, तर 17 जण बेपत्ता आहेत. नेपाळमधील 21 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूर आणि भूस्खलन, दरडी कोसळल्याने रस्ते वाहतुक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली आहे. पूरामुळे 35,843 घरे पाण्याखाली गेली आहेत. तर 1000 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 397 जनावरे वाहून गेली आहेत. तराई भागातल्या दुधौरा पूल पाण्याखाली गेला आहे.

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देऊबा यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या मंत्रिमंडळाची काल तातडीची बैठक झाली. त्यामध्ये स्थानिक प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)