नेपाळची “बिम्सटेक’मधून ऐनवेळी माघार

काठमांडू: नेपाळ लष्कराने भारतात होणा-या “बिम्सटेक’ या लष्करी सरावातून ऐनवेळी माघार घेत भारताला मोठा धक्‍का दिला आहे. या लष्करी सरावात नेपाळने सहभाग घेतल्यास देशात राजकिय वाद होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला. भारतात होणा-या लष्करी सरावात नेपाळ सैनिकांनी जावू नये, असा आदेश नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी दिले. दरम्यान, पुणे येथे होणा-या या सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी नेपाळ सैनिकांचे एक पथक शनिवारी रवाना होणार होते.

“बिम्सटेक’मध्ये सहभागी असलेल्या देशांमधील लष्कराचा सोमवारपासून पुणे येथे सराव शिबिर सुरू होणार आहे. या सरावात सहभागी होण्याबाबत सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांसह अन्य नेत्यांनीही त्याला तिव्र शब्दांत आलोचना करत विरोध दर्शविला. त्यानंतर नेपाळ सरकारने सरावातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी शिबिरात सहभागी होण्यासाठी नेपाळ सरकारने कोणत्याही प्रकारची सहमती घेतली नव्हती. यामुळे ओली यांनी ऐनवेळी माघार घेतली. ओली यांचे सल्लागार कुंदन आर्यल म्हणाले, बिमस्टेकच्या संयुक्त लष्करी सरावात नेपाळ सहभागी होणार नाही. याबाबत सरकारनेच सैन्याला या सराव शिबिरात सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या शिबिरात भाग घेण्यासाठी तीन अधिकारी यापूर्वीच भारतात दाखल झाले आहेत.

बे ऑफ बंगाल इनीशिएटिव फॉर मल्टी-सेक्‍टोरल टेक्‍निकल अण्ड इकनॉमिक को-ऑपरेशन (बिम्सटेक) ही एक क्षेत्रीय संघटना आहे. या संघटेनत भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ आदी देश सदस्य आहेत. या सर्व सदस्य देशांमधील लष्कर सहा दिवय एकत्रित युद्ध सराव करतात. यात 30-30 जवानांचे एक पथक सहभागी असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)