नेदरलॅंड मध्ये मोठा दहशतवादी हल्ला टळला

प्रातिनिधिक छायाचित्र

हेग – डच पोलिसांनी त्या देशात होऊ घातलेला एका मोठा दहशतवादी हल्ला टाळला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सात दहशतवाद्यांना त्यांनी वेळीच अटक केल्याने या घातपाताचा प्रकार उघडकीला आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि एके 47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी हल्ला करून अनेकांचे जीव घेण्याचा आणि त्यातून अराजकासारखी स्थिती माजवण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता असे पोलिसांनी सांगितले. अर्नेहेम आणि व्रीत या दोन शहरांमध्ये एकाचवेळी हल्ले करण्याची त्यांची योजना होती. त्याचा सुगावा पोलिसांना आधीच लागला होता. त्यानुसार या संशयीतांच्या पातळीवर ते होते. महिना भर त्यांच्या हालचालींची माहिती घेऊन त्यांच्या कटाविषयी खात्री झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक 34 वर्षीय इराकी इसम या कटाचा मुख्य सूत्रधार असून हा गट इस्लामिक कट्टरपंथीय आहे. अटक करण्यात आलेले सर्व जण 21 ते 34 या वयोगटातील आहेत. फ्रांसमधील एका इसमाला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून या कटाचा सुगावा लागला आणि नेदरलॅंड मधील या गटावर पाळत ठेवण्यात आली होती. या गटातील काहींनी या कटाची कबुली दिली आहे. नेदरलॅंड मध्ये इस्लामची सातत्याने बदनामी केली जात असल्याने त्या देशात हा नरसंहार करण्याची त्यांची योजना होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)