नेत्र रोग आणि आरोग्य

डॉ. राजेन्द्र माने

वयोगट कोणताही असो, डोळ्यांचे आजार डोकं वर काढतात. मात्र सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डोळ्यांच्या आजारांचा सारखा त्रास होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खूप लहान वयात चष्मा लागण्याचं प्रमाण अलीकडे वाढत चाललं आहे. काही वेळेला लाजेखातर मुलं फळ्यावरचं दिसत नाहीफ ही गोष्ट पालकांपासून लपवून ठेवतात. त्यामुळे हळूहळू हा त्रास वाढत जातो. आई-वडील दोघांनाही चष्मा असला की मुलांनाही चष्मा असतोच. टी. व्ही., कम्प्युटर यांच्या वाढत्या वापराचा जास्त ताण डोळ्यांवर पडतो. प्रदूषणामुळे डोळे लाल होणं, चिकटणं, डोळे येणं, डोळ्यात खुप-यां होणं असे नेत्रविकारही उद्भवतात. पोषण अभावामुळे रातांधळेपणाही खूप मुलांमध्ये आढळतो. या सर्वावर उपाय वैद्यांच्या सल्ल्‌याने करायचे असतात. मात्र डोळ्यांचे हे त्रास उद्भवू नयेत आणि म्हातारपणी दृष्टीचं तेज राखता यावं, यासाठी आपण स्वत: दक्ष असायला हवं. त्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते पाहू.
पोट साफ असावं आपल्या सगळयांच्या आयुष्यातील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पोट साफ नसल्यास त्याचा परिणाम हा डोळयांच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच रोज सकाळी पोट साफ करण्याची सवय लावून घेणं आवश्‍यक आहे.

डोळ्यांची स्वच्छता
दात घासल्यानंतर रोज सकाळी डोळेही गार पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे धुण्यासाठी बाजारात डोळ्यांच्या आकाराच्या वाटयाही मिळतात. त्यात पाणी घेऊन डोळा त्यात बुडवावा आणि डोळ्यांची उघडझाप करावी. लहान मुलांसाठी अशी वाटी वापरणं फायद्याचं ठरतं. मुलं स्वत: दात घासू लागले की, त्याला हातावर पाणी घेऊन डोळे धुण्यास शिकवावं. डोळे धुताना डोळ्यांच्या कडांना साचलेली घाण काढून टाकावी. रात्री झोपतानाही अशाच प्रकारे डोळ्यांची स्वच्छता करावी.

वाचन आणि लिखाण
दिसामाजी काहीतरी लिखाण व वाचन प्रत्येक जण करतो. वाचताना डोळे व पुस्तक यामध्ये किमान दीड फुटांचं अंतर असावं. ब-यांच लहान मुलांना वहीला डोकं लावून लिहिण्याची सवय असते. पालकांनी याकडे लक्ष देऊन, गरज वाटल्यास चष्म्याचा नंबर काढून घ्यावा. झोपून वाचू नये. वाचताना, लिहिताना पुस्तक किंवा वही यांवर भरपूर उजेड असावा.

टीव्ही पाहाताना..
अलीकडच्या छोटया घरातल्या छोटया हॉलमुळे टीव्ही आणि पाहणारे आपले डोळे यांमधलं अंतर बरंच कमी झालं आहे. त्यात काही मुलं अगदी जवळून किंवा डोळ्यांचा विशिष्ट असा तिरका कोन साधून टीव्ही बघतात. पालकांनी मुलांच्या या सवयी मोडायला हव्यात. नाहीतर त्या विशिष्ट कोनातूनच चष्म्याचा नंबर लागू शकतो. दूरदर्शन संचापासून लांब बसून दृष्टी सरळ ठेवून टीव्ही बघावा. सलग अध्रया तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहू नये. अंधा-या खोलीत खूप ब्राइट रंग करूनही पाहू नये.

उन्हापासून संरक्षण
तीव्र उन्हात डोळ्यांना त्रास होतो. त्यात पुन्हा प्लॅस्टिक किंवा रबराच्या चप्पल असतील तर विचारायलाच नको, उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा. चष्मा असणाऱ्यांनी उन्हात चष्म्याचा वापर करणं आवश्‍यक आहे. प्लॅस्टिक चप्पल वापरू नये. उन्हातून आल्यावर लगेच गार पाण्याने तोंड धुवू नये. थोडा वेळ थांबून मग तोंड धुवावे.

चष्मा
दूरचं किंवा जवळचं दिसण्याचं प्रमाण कमी झाल्याचं जाणवल्यास लगेच नेत्रतज्ज्ञांकडून डोळे तपासून घ्यावे. त्यांच्या सूचनेप्रमाणे चष्मा आवश्‍यक तेव्हा वापरावाच. उघडयावर चष्मा ठेवू नये. धूळ बसून तो खराब होतो. त्यामुळे चष्मा ठेवताना बंद पेटीतच ठेवावा. दिवसांतून दोन वेळा चष्मा स्वच्छ पुसून ठेवावा. थिएटरमधील सिनेमा, नाटक, दूरदर्शन बघताना, बाहेर फिरताना, उन्हात चष्मा वापरणं अगत्याचं आहे. मात्र चोवीस तास चष्मा वापरू नये.

डोळ्यांना आराम मिळण्यासाठी काही उपाय

पादाभ्यंग : पादाभ्यंग म्हणजे तळपायांना तेल/ तूप लावून ते जिरवणे. डोळे जळजळणे, चिकटणे, डोळ्यांत स्रव येणे, डोळ्यांसमोर पडदा तयार होणे अशा बारीकसारीक तक्रारी पादाभ्यांगाने दूर होतात. रात्री झोपताना तळपायांना साजूक तूप किंवा एरंडेल तेल लावल्यास उत्तम.

अंजन : डोळ्यांना अंजन घालणे हा हल्ली वादाचा विषय आहे. पूर्वीच्या काळी लहान मुलांसाठी घरीच काजळ बनवले जात असे. स्त्रिया आणि मुलं दोघेही ते वापरत. हल्ली बाजारात तयार काजळही मिळतं. पण मुलांना ते घालू नये, असं डॉक्‍टर सांगतात. स्त्रियांकडून स्वच्छतेच्या बाबतीत केला जाणारा हलगर्जीपणा थांबविण्यासाठी डॉक्‍टर हे सांगतात. परंतु योग्य ती स्वच्छता पाळून अंजनफकर्म करायलाच हवं. शक्‍यतो रात्री झोपताना डोळ्यात काजळ घालावं. त्यामुळे डोळे चिकटणं, जळजळणं असे विकार होत नाहीत. डोळ्यांत काजळ घातल्याने प्रखर सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचं संरक्षण होतं. डोळे चांगले राहतात. दृष्टी तीक्ष्ण होते.

काजळ बनवण्याची पद्धत : निरंजन वा समईमध्ये चांगल्या तुपाची वात लावावी. वातीसाठी स्वच्छ कापूस वापरावा. चांदीचं किंवा तांब्याचं स्वच्छ ताम्हण या ज्योतीवर धरावं. सुमारे दोन तास सलग ज्योत तेवत राहील, याची काळजी घ्यावी. ताम्हणावर जमा झालेली काजळी एरंडेल तेलाचे दोन थेंब घालून एकत्र कालवावी. तयार काजळ स्वच्छ डबीत भरून ठेवावं. प्रत्येक वेळी बाळाच्या डोळ्यात काजळ घालताना नखं काढलेली असावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)