नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते! राज ठाकरे यांचे कुंचल्यातून रामदेव बाबांना फटकारे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून योगगुरु बाबा रामदेव यांना जोरदार फटकारले आहे. “नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते’ असा टोला त्यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी पुढील पंतप्रधान कोण होईल हे सांगणे कठीण असल्याचे म्हटले होते. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रामदेव बाबा यांच्यावर टीका करत नेत्रासन करण्याचा सल्लाच दिला आहे.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दाखवले आहे. रामदेव बाबा दोघांकडेही पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. बाजूला रामदेव बाबा यांचे पुढील पंतप्रधान कोण होईल, हे सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य लिहिण्यात आले असून कंसात मोदी प्रशंसक लिहिले आहे. यामुळे दृष्यी सुधारते असेही उपहासात्मकपणे लिहिण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, बाबा रामदेव हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक होते. मात्र हवा बदलल्याने त्यांनीही सावध भूमिका घेतली. बाबा रामदेवच जर असं म्हणत असतील तर त्यात तथ्य असावे, असे राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून मांडले आहे. तसेच रामदेव बाबांच्या वक्तव्याची सोशल मीडियावरूनही चांगलीच चर्चा झाली होती.

#RamdevBaba #RahulGandhi #NarendraModi #PMfor2019 #Netrasan

Posted by Raj Thackeray on Friday, 28 December 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)