नेत्रचिकित्सक बनायचंय?

डोळ्यांची तपासणी करणाऱ्या व्यक्तींना ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजेच नेत्र चिकित्सक असे म्हणतात. या व्यक्ती डोळ्यांसंबधीची प्राथमिक तपासणी करण्यात तज्ज्ञ असतात. यामध्ये दृष्टितील दोष, दुखापत, डोळ्यांचे आजार आदी गोष्टींची पूर्तता करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

कामाचे स्वरूप – नेत्र चिकित्सकाचे मुख्यतः काम हे डोळ्यांची तपासणी करून आवश्‍यकतेनुसार चष्मा अथवा लेन्स लावण्याचा सल्ला देण्याचे काम करतात. तसेच गरजेनुसार पुढील उपचारांसाठी रुग्णाचे निरीक्षण करण्याचे काम करतात.

कसा घेता येतो प्रवेश? – विज्ञान शाखेतून 50 टक्के गुण प्रात्प केलेल्या युवकांना यामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. 12 उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम अथवा दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेता येतो. पदवी दरम्यान विद्यार्थी बॅचलर इन ऑप्टोमेट्री करू शकतात. अभ्याक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे.

इंटर्नशिपने करा सुरुवात – यासंबंधी आवश्‍यक कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्राशी संबंधित ठिकाणांवर इंटर्नशिप करणे आवश्‍यक असते. याकाळात विद्यार्थ्यांना एखाद्या मान्यताप्राप्त क्‍लिनिक अथवा रुग्णालयात डोळ्यांसंबंधी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागते. यादरम्यान अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

उपकरणांची माहिती –  नेत्र चिकित्सक बहुतेकदा ऑप्थोल्मोस्कोप, रेटिनोस्कोप आणि ट्रांसलेमिनेटर आदींचा वापर करतात. या शिवाय ऑप्टिकल रिफ्लेक्‍टर आणि स्नेलन चार्टसारख्या परीक्षण उपकरणांचा वापर करतात. याचा उपयोग दृष्टीचे बारकाईने परीक्षण करण्यासाठी होतो. या सर्व उपकरणांची माहिती यामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजचे आहे.

संधी – तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे आणि नव-नवीन गॅझेट्‌च्या अति वापरामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राशी संबंधित शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही एखाद्या क्‍लिनिक अथवा हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही ऑप्टिकल लेंसचे उत्पादन करण्याचे यूनिट सुरू करू शकता. याशिवाय अनेक तज्ज्ञ डॉक्‍टरांना प्रशिक्षित सहायकाची आवश्‍यक्‍यता असते जे उत्तम प्रकारे चष्मा, लेंस आणि डोळ्यांसंबधी उपकरणांची निर्मिती करू शकतील. सरकारी नियमानुसार चष्म्याच्या दुकानात प्रशिक्षित ऑप्टिशियन ठेवण्याचा नियम आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील तुम्ही नोकरी करू शकता.

वेतन – यासंबंधीचे आवश्‍यक असणारे शिक्षण एखाद्या नामांकित संस्थेतून पूर्ण केले असेल तर, सुरुवातीच्या काळात तुम्हाला साधारण 15 ते 20 हजार वेतन मिळू शकते. त्यानंतर या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर यामध्ये वाढ होऊ शकते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याची इच्छा नसेल तर व्यवसायदेखील करु शकता.

या गोष्टींची घ्या काळजी

लोकांची सेवा करण्याची इच्छा

काळजी आणि दयाळू स्वभाव असणे आवश्‍यक.

जीव विज्ञान आणि शरीर विज्ञान आदींबद्दल ज्ञान.

सखोल आणि बारकाईने काम करण्याची क्षमता.

विविध प्रकारचे ऑप्टिकल उपकरण वापरण्याचे तांत्रिक ज्ञान.

लक्ष केंद्रित करून काम करणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)