नेट, सेट परीक्षेत सुलभता

स्वरुपात होणार बदल 


सेटसाठी तीन ऐवजी आता दोनच पेपर

पुणे- सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आणि राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा (नेट) या परीक्षेचे स्वरुप बदलण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पॅटर्नही बदल होणार असून, यापुढील सेट परीक्षेसाठी तीन पेपर ऐवजी आता दोनच पेपर असतील. नवीन पॅटर्नच्या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये उत्सूकता आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नेट परीक्षा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना सेट परीक्षेची तीन पेपर द्यावे लागत होती. पहिला पेपर जनरल ऍटिट्यूट, दुसरा आणि तिसरा पेपर संबंधीत विषयावर होत होती. एकूण 350 गुणांची ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होत होती. सेट परीक्षेच्या तीन पेपरसाठी दिवसभरात होणारा थकवा आणि परीक्षेत सुलभता येण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.
या सर्व पार्श्‍वभुमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सुचना पुणे विद्यापीठाला दिले आहेत. त्यानुसार येत्या डिसेंबर महिन्यात होणारी सेट परीक्षा ही नवीन पॅटर्ननुसार होणार असल्याची माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.

नव्या बदलानुसार पहिला पेपर हा 100 गुणांचा जनरल नॉलेजवर राहील. यात 50 प्रश्‍न विचारले जातील. हे सर्व प्रश्‍न सोडविणे सर्वांना अनिवार्य आहे. दुसरा पेपर हा 200 गुणांचा संबंधीत विद्यार्थ्यांच्या विषयावर होईल. त्यात 100 प्रश्‍न असतील. प्रत्येक प्रश्‍न हा दोन गुणांचा असून, एकूण परीक्षा ही 300 गुणांची असेल. नव्या बदलात 350 ऐवजी 300 गुणांची ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सेट परीक्षेत सुलभता आली. त्यामुळे सेट परीक्षेच्या निकालात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

सेट परीक्षेचा चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर का?
सेट परीक्षा दि.26 जानेवारी रोजी झाली. त्याचा अंतिम निकालाची तयारी सेट विभागाकडून सुरू आहे. मात्र, या परीक्षेत एका प्रश्‍नाच्या उत्तराविषयी शंका असल्यास, त्या विद्यार्थ्यांना सेट विभागाकडे अर्ज करण्यासाठी एक हजार रुपयाचा धनादेश विद्यापीठाकडे जमा करावे लागते. जर पाच प्रश्‍न असतील, पाच हजार रुपयांचा डीडी द्यावा लागतो. ही रक्‍कम मोठी असून, सेट परीक्षेचा चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर का लादता, असा प्रश्‍न उपस्थित करीत अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी याप्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी कुलगुरूंकडे शुक्रवारी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)