“नेट’ परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे – सहायक प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षेचे प्रवेश पत्र (अॅडमिट कार्ड) नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेपूर्वी प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावेत, अशा सूचना एजन्सीने दिल्या आहेत.

नेटची पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा होत आहे. ही परीक्षा दि. 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9.30 ते 1 आणि दुपारी अडीच ते सहा या दोन सत्रात पेपर होणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आवश्‍यक आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यास लिंक खुली करण्यात आली आहे, असेही एजन्सीने नमूद केले आहे.

दरवर्षी सीबीएसईद्वारे नेटची परीक्षा व्हायची. आता सीबीएसईवरील होणारा ताण कमी करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नेट परीक्षेची जबाबदारी दिली आहे. त्यांच्यामार्फत प्रथमच नेटची ऑनलाइन परीक्षा होत आहे. याविषयी अधिकची माहिती एजन्सी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
11 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
21 :blush:
1 :cry:
12 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)