नेकलेस पॉइंटजवळ बेशिस्त पार्किंग

जोगवडी- कापूरहोळ-भोर मुख्य मार्गावर नेकलेस पॉइंट आहे. हा पॉइंट पाहण्यासाठी सुटीच्या काळात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र, येथील रस्त्यालगत होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. भोर परिसरामध्ये भाटघर धरण, नीरा-देवघर धरण अशी दोन प्रमुख धरणे आहेत. याचबरोबर काही महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले देखील आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. कापूरहोळपासून सहा किलोमीटर अंतरावर एका वळणावर नीरा नदीचे सुमारे एक किलोमीटरचे वळण नेकलेसच्या आकाराचे असल्याने या पॉइंटवर पर्यटक ते पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, या पॉइंटच्या ठिकाणी नागरिक अत्यंत बेशिस्त पद्धतीने वाहने पार्क करीत असल्याने इतर वाहतुकीस धोका निर्माण होत असून, अपघाताची शक्‍यता वाढली आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाचे याकडे दुर्लक्ष होत असून, याचा त्रास इतर वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)