नॅन्सी पॅलोसी यांची दुसऱ्यांदा प्रतिनिधी मंडळाच्या सभापतीपदी निवड 

वॉशिंग्टन (अमेरिका) – डेमॉक्रेटिक सांसद नॅन्सी पेलोसी यांची अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाच्या सभासदपदी निवड झाली आहे. प्रतिनिधी मंडळाचे सभापदीपद भूषणवाऱ्या त्या एकमेव महिला सांसद आहेत. आणि दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड होणाऱ्या निवडक सांसदांपैकी एक आहेत.

अमेरिकन प्रतिनिधी मंडळाच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड होण्याची घटना 50 वर्षांपूर्वी घडली होती. डेमॉक्रेटिकपैकी अनेकांचा नॅन्सी पेलोसी दुसऱ्यांदा सभापती बनण्यास विरोध असला, कॅलिफोर्नियाच्या सांसद नॅन्सी पेलोसी यांना आपली पुन्हा निवड होण्याबाबत पूर्ण विश्‍वास होता. रिपब्लिकन उमेदवार केवीन मॅकार्थी यांचा 220 विरुद्ध 192 मतांनी पराभव करून नॅन्सी पेलोसी पुन्हा सभापती बनल्या आहेत. आता त्या अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वशक्तिमान राजकारणी बनल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विभाजित सरकारच्या सभापती बनल्यानांतर नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले, की हे सभागृह म्हणजे संपूर्ण अमेरिकेसाठी टाऊन हॉल बनले पाहिजे. येथे जी चर्चा चालते, ती त्यांना समजली पाहिजे आणि त्यांची मतेमतांतरे आपल्यापर्यंत पोहचून त्याचा परिणाम आपल्या निर्णयांमध्ये दिसला पाहिजे.

डेमॉक्रेटिक प्राधान्यक्रमामध्ये त्यांनी आरोग्य सेवा खर्च कमी करणे, हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, शासनाची एकात्मिकता पुनर्स्थापित करण्यावर भर दिला. मध्यमवर्ग हा लोकशाहीचा कणा असून त्याच्यासाठी आपण कार्य केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)