नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची केरळ पूरग्रस्तांना मदत

पिंपरी : पूरग्रस्तांना पाठवण्यासाठी जमा केलेले साहित्य.

पिंपरी- महापूरामुळे केरळमध्ये जनजनीवन पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले. पूरग्रस्त बांधवांसाठी तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी धान्य, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू, स्टेशनरी आदी साहित्य जमा करून सेवा भारती पुणे संस्थेकडे सुपूर्द केले आहे. पियुष भट, शुभम्‌ महाजन यांनी उपक्रमात पुढाकार घेतला. विभाग प्रमुख प्रा. नितीन धवस, प्रा. नितीन वानखेडे, प्रा. राधा देवघरे, प्रा. अदिती दास, प्रा. श्रद्धा किर्वे, प्रा. पूनम देवरे, प्रा. अपर्णा पांडे यांनी सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)